शिझान खान ‘या ‘कार्यक्रमात करणार कमबॅक

शिझान खान ‘या ‘कार्यक्रमात करणार कमबॅक

मुंबई, ३० एप्रिल २०२३, प्रतिनिधी : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणामुळे अभिनेता शिझान खान खूप चर्चेत राहिला. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या आईने शिझानवर आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. झिशानने दोन महिने तुरुंगवास भोगला. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. तर, ‘अली बाबा दास्ताए कबूल’ ही शिझानखानची शेवटची मालिका होती.

दरम्यान, कलर्स हिंदी वाहिनीवरील दिग्दर्शक, निर्माता रोहित शेट्टीचा प्रसिद्ध कार्यक्रम खतरों के खिलाडी – १३ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या कार्यक्रमात अभिनेता शिझान खान खतरों के खिलाडी – १३ मध्ये झळकणार आहे. शिझानवर न्यायालयीन खटला सुरू असल्यामळे तो भारताबाहेर प्रवास करू शकत नाही. त्यामुळे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिझानने न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर न्यायालयाने शिझानला परवानगी दिली आहे. दरम्यान, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व स्पर्धक खतरों के खिलाडी १३च्या चित्रिकरणासाठी अर्जेंटिनाला रवाना होणार आहेत.

खतरों के खिलाडी १३मध्ये नायरा बॅनर्जी, अर्चना गौतम, शिव ठाकरे, अंजुम फकीह, रुही चतुर्वेदी, अरिजित तनेजा, अंजली आनंद, शरद मल्होत्रा, मुनावर फारुकी, प्रिन्स नरुला आणि अंजली अरोरा हे स्पर्धक सहभागी होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. ‘खतरों के खिलाडी १३’ शीझान खान कसा खेळतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. लवकरच ‘खतरों के खिलाडी’च्या नव्या पर्वाला सुरुवात होणार असून चाहते हा कार्यक्रम पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version