येवला : येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी राज्याचे अन्न,नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ उपस्थित असतील. लोकार्पणाचा हा कार्यक्रम रविवार १५ सप्टेंबर रोजी होणार आहे. याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मंगळवार १० सप्टेंबर रोजी येवला शहरात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.