आम्ही करून दाखवू म्हणणाऱ्या शिवसेनेनं मुंबईकरांचे ‘पाणी महाग’ करुन दाखवलं

आम्ही करून दाखवू म्हणणाऱ्या शिवसेनेनं मुंबईकरांचे ‘पाणी महाग’ करुन दाखवलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आम्ही करून दाखवू म्हणणाऱ्या शिवसेनेनं मुंबईकरांचं पाणी महाग केले आहे.

 

एकिकडे मालमत्ता करमाफी आणि सवलतीची तयारी दर्शवलेल्या शिवसेनेनं पाण्याचे दर वाढवत मुंबईकरांचा अपेक्षाभंग केला.

 

पाण्याच्या दरात सुमारे 6 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

2012च्या निर्णयानुसार पाण्याचे दर वाढवण्यात आले. हा प्रस्ताव पुन्हा चर्चेसाठी घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली.

 

मात्र, स्थायी समितीनं ती फेटाळली आणि निर्णय लागू केला त्यामुळे विरोधकही संतप्त झाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version