नगरसेवक अधिकाऱ्यांकडून हप्ते घेऊन माझा आवाज दाबतात; डोंबिवलीतील शिवसेना नगरसेवकाचा खळबळजनक आरोप

नगरसेवक अधिकाऱ्यांकडून हप्ते घेऊन माझा आवाज दाबतात; डोंबिवलीतील शिवसेना नगरसेवकाचा खळबळजनक आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

प्रशासनातील भ्रष्टाचार आणि अव्याहत सुरू असलेल्या गैरव्यवहारांच्याविरोधात कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नगरसेवक वामन म्हात्रे यांनी

सोमवारी राजीनामा दिला. 

 

प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे, सिंडिकेट रिंगमुळे राजीनामा देत असल्याचे महापौर आणि आयुक्तांना राजीनाम्याचे पत्र दिले. 

 

वामन म्हात्रे यांच्या आक्रमक पावित्र्यामुळे पालिका, तसेच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. गेली 20 वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत असलेले वामन म्हात्रे यांनी

स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी उपोषण केले होते.

 

मात्र, फेरीवाले हटले नाहीत. उलट सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अधिकाऱ्यांकडून हप्ते घेऊन माझा आवाज दाबत आहेत असा आरोप वामन म्हात्रेंनी केला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version