शिवबंधनापाठोपाठ आता शिवसैनिकांच्या हातात दिसणार वाघाची अंगठी

शिवबंधनापाठोपाठ आता शिवसैनिकांच्या हातात दिसणार वाघाची अंगठी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवबंधनापाठोपाठ आता शिवसैनिकांना वाघाच्या अंगठीचं वाटप करण्यात आलं आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मंगळवारी जयंती आहे, त्यापार्श्वभूमीवर या अंगठ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. 

शिवसेनेच्या कुलाबा विभागाच्यावतीने ससून बंदर येथे वाघाच्या मुखाची प्रतिकृती असलेल्या खास अंगठ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. 

यावेळी खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख पांडूरंग सकपाळ आणि कृष्णा पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार सावंत यांच्या हस्ते विभागातील सुमारे 800 शिवसैनिकांना या अंगठ्यांचं वाटप करण्यात आलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version