चर्चा किंवा युतीसाठी शिवसेनेनेही पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री फडणवीस

चर्चा किंवा युतीसाठी शिवसेनेनेही पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री फडणवीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

चर्चा किंवा युतीसाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा. भाजपाने शिवसेनेशी चर्चा किंवा युती करायला कधीही नकार दिलेला नाही. आम्ही चर्चेसाठी कधीच नकार दिलेला नाही.असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्रकार परिषदेतले मुद्दे

  • पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला भाऊसाहेब फुंडकर यांना वाहीली श्रद्धांजली…
  • पालघरमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला म्हणून पालघरच्या जनतेचे आभार 
  • ही निवडणूक क्लेशदायी, आमच्या मित्र पक्षाने आमचा उमेदवार स्वत:च्या बाजूने उभा केला 
  • वनगा कुटूंबासाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत
  • सरकार मधील दोन पक्षांनी अशी निवडणूक लढवावी का याचा विचार करावा
  • भंडारा गोंदियातील पराभव आम्ही मान्य करतो
  • ही निवडणूक पावसाळ्यानंतर असती तर चित्र वेगळे असती
  • सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन
  • नऊ महीन्यानंतर त्या ठीकाणी भाजपच निवडूण येईल
  • एव्हीएम मधील बिघाड या विषय निवडणूक आयोगाने गांभिर्याने घेतला पाहीजे
  • आम्हाला या बिघाडीचा फटका बसला
  • निवडणूक आयोगाने ज्या ज्या ठीकाणी एव्हीएम बंद पडले त्या ठीकाणी वेळ वाढवून दिली पाहीजे होती मात्र हा विषय गांभिर्यांने घेतला पाहीजे
  • पालघरच्या जनतेचे आभार मानतो
  • ही निवडणूक आमच्यासाठी संपलेला विषय
  • या निवडणुकीमुळे कडवट पणा आला
  • पुढच्या चार जागांसाठी आम्ही युती साठी तयार
  • युती असावी ही आमची भुमिका आहे
  • युतीच्या चर्चेला आम्ही नेहमीच तयार
  • भाजप विरोधात बाकी पक्षांसोबत शिवसेना जाईल असे मला वाटत नाही
  • लोकांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य
  • एव्हीएम मध्ये बिघाड असता तर आम्ही सर्व देश जिंकलो असतो
  • आमचा सुशिक्षित मतदार हा सकाळच्या वेळेला मतदान करायला जातो त्यावेळी एव्हीएम बंद पडतात आणि त्याचा फटका आम्हाला बसतो
  • एवढे आरोप निवडणूक आयोगावर होत आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने उत्तर दिले पाहीजे

पुढील निवडणुका स्वबळावरच लढणार – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version