जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नारायण राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर राणे कुठल्या पक्षात जाणार याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या आहेत.
नारायण राणेंनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना आणि नारायण राणेंमधले वाद चव्हाट्यावर आला आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसलेंनी नारायण राणेंवर शेलक्या भाषेत टीका केली. नारायण राणेंविरोधात अरविंद भोसलेंनी होर्डिंगच्या माध्यमातून आक्षेपार्ह आणि वादग्रस्त भाषेत टीका केली.या होर्डिंगनंतर आता नवीन राजकीय नाट्याला सुरुवात झाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.