सेनेचा ‘एकला चलोरे’चा नारा कायम, युतीची शक्यताही नाकारली

सेनेचा ‘एकला चलोरे’चा नारा कायम, युतीची शक्यताही नाकारली

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

अहमदनगरमध्ये घडलेल्या हत्याकांडावर टिका करत शिवसेना प्रवक्ते संजय राउत यांनी संपूर्ण प्रकरणाला गृहखात्याला जबादार ठरवलंय. अहमदनगरमधील दुहेरी हत्याकांड हे राजकिय हत्याकांडं असून भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांच्यावर होणाऱ्या आरोपांकडेही त्यांनी लक्ष वेधलंय.

गृहखातं मुख्यमंत्र्यांकडे असून, गृहखात्याला वेगळा मंत्री नसल्याने राज्यात अशा घटना घडत असल्याचं म्हणत, वेगळा गृहमंत्री नेमण्याची मागणीही त्यांनी केलीय. तर, 2019 च्या निवडणूकीत भाजब बरोबर युती अशक्य असल्याचे त्यांनी म्हटलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version