जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मेट्रो आणि मोनो प्राधिकरणांना बांधकामाच्या परवानगीसाठी विशेष दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
हा प्रस्ताव सुधार समितीत शिवसेनेनं अडवलाय. मेट्रो आणि मोनोच्या बांधकामासाठी पालिकेची परवानगी घेताना सेनेकडून अडवणूक होते.
ही अडवणूक दूर करण्यासाठी हा प्रस्ताव नगरविकास खात्यानं पालिकेत पाठवला होता.
शिवसेनेचा मेट्रो कामांना होणारा हा विरोध मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव पाठवला. मात्र, शिवसेनेनं तूर्तास या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेता सुधार समितीतच अडवून ठेवला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.