जय महाराष्ट्र न्यूज, नांदेड
नांदेड महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवत असल्याने दोन्ही पक्षातील नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतले.
पण,काल सेनेच्या आमदारांनी भाजपचा महापौर निवडून आणावा असे आवाहन नांदेडकरांना केलं होते. हाच धागा पकडून त्यांच्या पक्षातील नेत्यांनी प्रताप चिखलीकरांवर टीकेची झोड उठवली. लग्न एका सोबत करायंच आणि कुंकू दुसऱ्याच्या नावाने लावयंच अशी टीका हेमंत पाटलांनी केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.