…म्हणून शिवसेनेने पक्षांतर्गंत महत्वाचे बदल केले

…म्हणून शिवसेनेने पक्षांतर्गंत महत्वाचे बदल केले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेनं 2019च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींसाठी आतापासूनच तयारी सुरु केलीये. यासाठी शिवसेनेनं पक्षांतर्गंत बदल करण्यास सुरुवात केलीये. याची सुरुवात संपर्कप्रमुखांच्या बदल्यांपासून केलीय.

रायगडच्या संपर्कप्रमुख पदी ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांची नेमणूक करण्यात आलीय. तर, ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्याकडे कर्जत-खालापूर, पनवेल आणि उरणची जबाबदारी देण्यात आलीय.

तर, दुसरीकडे पालघर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी आमदार रवींद्र फाटक यांच्यावर सोपवण्यात आलीय. कोकण विभागातील महत्वाचे बदल करुन शिवसेनेनं तेथील आपला पाया आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version