शिवसेनेच्या दबावामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला; शिवसेना नेत्याचे वक्तव्य

शिवसेनेच्या दबावामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला; शिवसेना नेत्याचे वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

शिवसेनेच्या दबावामुळेच राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाय असे वक्तव्य शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्राध्यापक नितीन बानूगडे पाटील यांनी केलंय.

यावेळी,शिवसेना पूर्ण समाधानी नसल्याचं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली. शिवसेनेने सातत्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा उभारला. हे सरकार नेहमीच तारीख पे तारीख देत होते मात्र, शिवसेनेच्या दबावामुळे किमान काही शेतकऱ्यांची तरी दिवाळी गोड होतेयं.या

पुढेही सरसकट कर्जमाफीची भूमिका राहणार असल्याचेही बानूगडे पाटील यांनी सांगलीत बोलताना स्पष्ट केलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version