मुंबईत शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

मुंबईत शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या चेंबूरमध्ये शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय.  मुंबईत काँग्रेसच्या वतीनं एनडीए खासदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं होतं.

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या कार्यालयावर महागाई आणि नोटाबंदीविरोधात मोर्चा काढण्यात आला होता.

त्यामुळे शिवसैनिकही मोठ्या प्रमाणात जमले होते.  काँग्रेसनं काढलेल्या मोर्चात राहुल शेवाळे यांच्या कार्यालयात जाऊन निवेदन देण्याची मागणी करू लागले.  यावरून काही शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्ये भिडले. शिवसैनिक आणि काँग्रेसमध्ये झालेल्या या राड्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version