जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईमध्ये आता नवा सामना रंगलाय. हा सामना रंगतोय मुंबई महापालिका आयुक्त अजोय महेता आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यात.
आयुक्त ऐकत नसल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेनं आता आयुक्तांविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिली. आयुक्त आणि महापौरांमध्ये 3 महिन्यांपासून वादाचं नाट्य रंगत आहे. याची ठिणगी पडली ती घनकचरा व्यवस्थापन प्रदर्शनावेळी.
या कार्यक्रमाची माहिती आयुक्तांनी महापौरांनी दिली नव्हती. आयुक्त एकछत्री कारभार करत असल्याचा आरोपही महापौरांनी केला. मातोश्रीच्या दरबारीही आयुक्तांची तक्रार करण्यात आली.
पण, उद्धव ठाकरेंनी दखल न घेतल्यानं हा वाद आणखीनच चिघळला. त्यामुळे शिवसेनेनं आयुक्तांविरोधात ठराव मांडण्याचा इशारा दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.