जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई महापालिकेत भांडूपची पोटनिवडणूक होते आहे. काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनानंतर भांडूप पश्चिम प्रभाग क्रमांक 116 जागा रिक्त आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.
या पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत अटीतटीची लढत होत आहे. महापालिकेत शिवसेनेची सत्ता काठावर असल्याने, भाजपाने या प्रभागात मोर्चेबांधणी केली.
यासाठी प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील यांना भाजपाने तिकीट दिले. तर, शिवसेनेनं स्थानिक आमदारांच्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविलंय.
आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील शिवसेनेकडून निवडणूक लढत आहेत. या प्रभागात विजय मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली. यामध्ये काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, जनता सेक्युलर या पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे. मात्र, खरी लढत शिवसेना आणि भाजपात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.