जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली. तर शेतकऱ्यांनी आपला संप पाठीमागे न घेता तसाच सुरू ठेवावा. म्हणजे सरकारला जाग येईल असा सल्ला शिवसेना खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
शेतकऱ्यांच्या संपावरून शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांनी सरकारवर टीका केली. ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच काम केलं नाही. त्यामुळे शिवसेना शेतकऱ्यांसोबत असल्याची प्रतिक्रीया शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिली. त्याचबरोबर मुख्यमंत्री हे एकटे लढतायत त्यांच्यासोबत कोणीही लढत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.