सत्तेतून बाहेर पडा; शिवतीर्थावर जमलेल्या शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

सत्तेतून बाहेर पडा; शिवतीर्थावर जमलेल्या शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सत्तेतून बाहेर पडावे अशी मागणी शिवसेना आमदारांकडून करण्यात येत असताना आता शिवसैनिकांनी देखील हीच मागणी केली आहे.

 

राज्यभरातील अनेक शिवसैनीक दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत सत्तेतून बाहेर पडावे अशी मागणी केली आहे.

 

भाजप कडून सन्मान मिळत नाही. कर्जमाफीवरून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे सतेतून बाहेर पडण्याची घोषणा आज करावी अशी अपेक्षा शिवसैनिकांनी केली.

 

बाळासाहेब असते तर सत्तेला लाथ मारून बाहेर पडले असते अशी प्रतिक्रियाही शिवसैनिकांनी दिली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version