75 हजार सीडींचा वापर करुन साकारली शिवजी महाराजांची प्रतिकृती

75 हजार सीडींचा वापर करुन साकारली शिवजी महाराजांची प्रतिकृती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतल्या विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये तब्बल 75 हजार गाण्याच्या सिडीचा वापर करुन, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

 

विक्रोळीच्या राहणाऱ्या चेतन राऊत या तरूणाचा हा कलाविष्कार आहे. चेतन राऊत हा जे जे स्कूल ऑफ आर्टचा विद्यार्थी आहे.

 

1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून त्यानं ही कलाकृती साकारण्यास सुरुवात केली आणि तब्बल 48 तासानंतर त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती पूर्ण केली.

 

दरम्यान, शिवाजी महाराजांच्या या प्रतिकृतीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी यासाठी प्रस्ताव पाठण्यात आला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version