जय महाराष्ट्र न्यूज, लातूर
शिवजयंतीनिमित्त लातूरकरांनी छत्रपती शिवजी महाराजांची प्रतिमा रांगोळीच्या रुपात उभारली. यात नवल म्हणजे ही प्रतिमा छोटी नसून चक्क दीड एकर परिसरात शिवरायांची भव्यदिव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे.
ही भव्यदिव्य प्रतिमा निर्माण करण्यासाठी शंभर पेक्षा जास्त कलाकारांनी सहभाग घेतला असून यासाठी तब्बल 50 हजार किलो रांगोळी वापरली गेली आहे. इतकेच नव्हे तर या रांगोळीची नोंद लवकरच गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होईल असा विश्वास देखील आयोजकांनी व्यक्त केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.