मुस्लिम विद्यार्थ्यांनी केले शिवचरित्राचे वाचन

मुस्लिम विद्यार्थ्यांनी केले शिवचरित्राचे वाचन

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

शिवजयंतीच्या निमित्तानं औरंगाबादमध्ये आज एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. धार्मिकदृष्टया सेन्स्टीव्ह शहर म्हणून औरंगाबादची ओळख होत असताना आज मात्र क्रांती चौकातील पुतळ्याजवळ धार्मिक सलोखा पाहायला मिळाला.

शहरातील क्रांती चौकातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवताली मुस्लिम तरुणांनी आणि मुलांनी शिवाजी महाराजांवर जीवनावर आधारित विविध पुस्तकांचे वाचन केले .

शिवाजी महाराजांच्या आणि मावळ्यांच्या वेशभूषेत असलेले हे सर्व विद्यार्थी मुस्लिम आणि इतर धर्मीय आहेत. सध्या समाजात महाराजांच्या नावाने राजकारण केलं जातं, ते थांबवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितले. या अनोख्या उपक्रमाचे मराठा संघटना आणि औरंगाबादकरांनी स्वागत केलंय. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version