रायगडमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला असल्याने रायगडावर कोणताही कार्यक्रम साजरा होत नाही. मात्र किल्ले रायगडावरून गावोगावी शिवज्योत नेण्याची परंपरा अनेक मंडळामध्ये आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, पोवाडे, भगवे झेंडे आणि मशाली म्हणजे शिवज्योत घेऊन तरुण गावोगाव शिवजयंती साजरी करण्यासाठी जात असल्याचे चित्र रायगडच्या रस्त्यांवर दिसत आहे.
भारताचे प्रवेशद्वार म्हणजेच गेट ऑफ इंडिया येथे अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार अरविंद भाई सावंत, उप महापौर अँड. सुहास वाडकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार, स्थानिक नगरसेविका सुजता सानप,”ए” विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रभारी शिवदास गुरव, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष किसन जाधव, सरचिटणीस संजय शेटे उपस्थित होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.