राज्यात 1 हजार ठिकाणी स्वस्त जेवणाची केंद्रे उभारणार, शिवसेनेचा वचननामा जाहीर

राज्यात 1 हजार ठिकाणी स्वस्त जेवणाची केंद्रे उभारणार, शिवसेनेचा वचननामा जाहीर

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेने आपला वचननामा आज जाहीर केला आहे. शिवसेना नेहमी जे करू शकेल ते बोलते आणी जे बोलते ते करते. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  तसेच या वचननामा राज्याच्या तिजोरीत किती भार पडेल हे पाहून केला आहे. असे ही ते म्हणाले आहेत.

शिवसेनेच्या वचननाम्यातील काही महत्वाचे मुद्दे 
प्रथम ती संकल्पनेअंतर्गत 
आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना महाविद्यालयिन शिक्षण विनामूल्य करणार
प्रत्येक जिल्ह्यात बचतगट उभारणार
सर्व शासकीय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनी  सॅनिटरी नॅपकिंन उपलब्ध करून देणार
शेतकऱ्यांसाठी 
शेतीखालील क्षेत्रवाढी साठी शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार प्रतिवर्षी जमा करणार
कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार
शेत तिथे ठिबक सिंचन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 3 वर्षाकारिता 95 टक्के अनुदान देणार
शेतीमधील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आवश्यक घटकांच्या किमती पुढील 5 वर्षे स्थिर ठेवणार
शिक्षण सुविधा 
तालुका स्तरावर गाव ते शाळा महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी 2500 विशेष बसची सुविधा देणार
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षण व स्वयंरोजगार प्राप्तिकरिता शून्य टक्के कर्ज योजना राबवणार
मध्यान भोजन योजनेला दर्जामुक्त करणार
शहर विकास 
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शहर सडक योजना अंमलात आणणार
ज्या राज्यात शहरांतर्गत बस सेवा नाही अशा शहरात एस टी च्या वतीने इलेक्ट्रिक बस सुरू करणार
अ व ब गट नागरपालिकांमध्ये पादचारी मार्ग निमितीसाठी अर्थसंकल्पत तरतूद
वीज निर्मिती व दर कपात
300 युनिट पर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर 30 टक्क्यांनी कमी करणार
शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन प्राप्त व्हावे याकरीता पडीक जमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती
आरोग्य सुविधा 
सर्व जिल्ह्यांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालह
वन रुपी क्लिनिक शिव आरोग्य योजने अंतर्गत आरोग्य चाचणी
दुर्गम भागात मिनी मोबाईक आरोग्य केंद्र
सागरी किनारपट्टीचा विस्तार लक्षात घेऊन बोट अंबुलन्स
जिल्हा रुग्णालय मध्ये स्त्रियांसाठी  कर्करोग चाचणी
अन्न हे पूर्णब्रह्म 
राज्यात 1 हजार ठिकाणी स्वस्त व सकस जेवणाची केंद्रे
स्वच्छता पर्यावरण 
5 वर्षात इलेक्टरीकल वाहन धोरण गतिमान व्यापक करणार
गावातील नद्या नाले विहिरी तळे यामधील प्रदूषण टाळण्यास एस टी पी योजना राबवणार
मुंबई सह कोकन खड्यांमधील कांदळवन संरक्षण राबवणार
उद्योग व रोजगार
राज्य शासनातील सरकारी नोकरीतील सर्व रिक्त पदे भरणार
स्थानिकांना 80 टक्के आरक्षित
मुंबई शहर पर्यटन केंद्र व्हावे म्हणून अनिवासी क्षेत्रात सर्व सोयी सुविधा देणार
गृहनिर्माण
पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री आवास योजना आणू
अभय योजने अंतर्गत मुंबई ठाण्यातील भक्कम स्वरूपातील अनियमित बांधकामे नियमित करणार
मुंबईतील म्हाड्याच्या 56 वसाहतींचा विकास होणार जुन्या इमारतीच्या पुनर्विकास साठी 6 महिन्यात गृहनिर्माण धोरण आमलात आणणार
भाडेकरूंचे हक्क  अबाधित ठेवण्यासाठी रेरा कायदा अंतर्गत सुरक्षित करणार
मुंबइ ठाणे कोकण कोळीवाडे गावठाणात स्वयं विकासाची परवानगी देणार
एस आर ये योजना ऐवजी मुंबई अभय योजना
मराठी भाषा 
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्मान करणार
मराठीचे पुरातन दस्तावेज एऐतिसाहिक संस्कृतीचे देवाण घेवाण करण्यासाठी मराठी विद्यापीठ निर्माण करणारी
गृह विभाग 
यापुढे पोलीस भरती मध्ये पूर्वी प्रमाणे प्रथम मैदानी नंतर लेखी परीक्षा
पोलीस व जवानांच्या मुलाला प्राधान्य
राज्य राखीव पोलीस दलात कर्मचारी जिल्हा पोलिस सेवे मध्ये असलेली 15 वर्षे अट बदलून 10 वर्षे
पर्यटन कला आणि संस्कृती 
राज्यातील सर्व गावांमधील पारंपरिक धार्मिक स्थळांना अनुदान देणार
कोकणात जागतिक पर्यटनाला चालना मिळणासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी विमानतळ कार्यान्वित करणार
सामाजिक न्याय 
धनगर बंजारा कोळी लिंगायत ओबीसी भटके विमुक्त अशा व इतर  समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवणार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version