‘शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशात निवडणूक लढणार’

‘शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशात निवडणूक लढणार’

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुका सात टप्प्यांमध्ये घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तर मणिपूरमध्ये दोन आणि पंजाब, गोवा, उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात मतदान होणार आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या घोषणेचे स्वागत केले. देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका होत असल्यामुळे याबाबत संजय राऊत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. शिवसेना पाच राज्यांपैकी गोवा आणि उत्तर प्रदेश राज्यात निवडणूक लढवणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच गोव्यामध्ये महाविकास आघाडी स्थापनेच्या विचारात असल्याचे राऊतांना सांगितले आहे. त्यामुळे गोव्यात काँग्रेसने शिवसेनेच्या सोबत यावे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

असे होणार मतदान

पंजाब, गोवा, उत्तराखंड या राज्यांमध्ये १४ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. तर मणिपूरमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये पहिला टप्पा २७ फेब्रुवारी आणि दुसरा टप्पा ३ मार्च रोजी होणार आहे. आणि सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिला टप्पा १० फेब्रुवारी, दुसरा टप्पा १४ फेब्रुवारी, तिसरा टप्पा २० फेब्रुवारी, चौथा टप्पा २३ फेब्रुवारी, पाचवा टप्पा २७ फेब्रुवारी, सहावा टप्पा ३ मार्च, सातवा टप्पा ७ मार्च रोजी मतदान होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version