केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मंगळवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी ७ वाजता एका हॉटेलमध्ये होणार आहे. एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्विकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आजच्या कार्यकारिणीतीत कामकाज प्रस्ताव सादर होतील. तसंच मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्यता आहे. यापुढे दिल्या जाणाऱ्या एबी फॅार्मवर कुणाच्या सह्या असतील हेही बैठकीत ठरवलं जाईल. दरम्यान, या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या वतीने शाखांसोबतच पक्ष आणखी मजबूत करण्यावर भर असणार आहे. याचसाठी कार्यकारणी बोलवण्यात आली असून विविध प्रस्ताव सादर करण्यात येतील.
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. यामध्ये अनेक आमदारांना अद्याप मंत्रीपदी भढती मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय कार्यकारणीत सामावून घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.