‘शिवसेनेचा मुख्यमंत्री गर्वाने सांगतो, त्यांनी बाबरी पाडली’, वारिस पठाण यांचा मविआला टोला

‘शिवसेनेचा मुख्यमंत्री गर्वाने सांगतो, त्यांनी बाबरी पाडली’, वारिस पठाण यांचा मविआला टोला

मुस्लीम आरक्षणाची मागणी करत एमआयएमची रॅली मुंबईत दाखल झाली आहे. मात्र ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तरिही मुंबईत सभा घेण्याच्या भूमिकेवर एमआयएम ठाम असून इम्तियाज जलील आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीत चांदीवलीत सभा पार पडली.

एमआयएमच्या सभेदरम्यान आमदार वारिस पठाण यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री गर्वाने सांगतो की, त्यांन बाबरी पाडली’ असा टोला वारिस पठाण यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. राज्य सरकारला आरक्षण द्यायचे नाही. परंतु आम्हाला ५ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. तसेच आरक्षण आमच्या हक्काचे असल्याचे आणि वक्फच्या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घातल्याचे ते म्हणाले.

पोलिसांकडून रॅलीला अटकाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र चांदिवलीत एमआयएमचे कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असून यावेळी घोषणाबाजी बरोबरच जोरदार शक्तिप्रदर्शनही एमआयएमच्यावतीने करण्यात आले.

एमआयएमच्या कार्यकर्त्यांना मालेगावात स्थानबद्ध

रॅलिसाठी मुंबईला निघालेल्या एमआयएमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मालेगावात स्थानबद्ध केले. मालेगावात ५०हून अधिक कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल्यामुळे कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले. त्यामुळे तेथे तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version