सोमवारी २० फेब्रुवारी २०२३ रोजी, पुण्यात शिंदे यांच्या सभा स्थळाबाहेर माविआने गोंधळ केला आहे. कसबा मतदारसंघांतील आरसीएम गुजराती कॉलेजमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा सुरु असताना त्या मार्गावरून महाविकास आघाडीची रॅली गेली. या दरम्यान, माविआ आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन केले. यावेळी, मविआकडून “५० खोके, एकदम ओके” अशी नारेबाजी करण्यात आली. मविआच्या या घोषणाबाजी विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले.
महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ ही रॅली काढण्यात आली होती. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते अजित पवारही या रॅलीत उतरले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.