मुंबई, १६ जून २०२३, प्रतिनिधी : शिवसेनेच्या जाहिरात वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदेंच्या जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली, असं मत व्यक्त करत शरद पवारांनी युतीला डिवचलं आहे. काही दिवसांपूर्वी शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे जनतेमध्ये सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याच्या सर्व्हेची जाहिरात विविध वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा नवा नारा देण्यात आला होता. यानंतर भाजपा-शिंदे गट युतीत सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले होते. या जाहिरातीवरून दोन्ही बाजुचे कार्यकर्ते-नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती.
पालघरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात फडणवीस व शिंदे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.आता या जाहिरात वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शिंदेंच्या जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली, असं मत व्यक्त करत शरद पवारांनी युतीला डिवचलं आहे. शरद पवार म्हणाले की,राज्य सरकारने जाहिरात देऊन चूक केली. सध्याच्या सरकारमध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. सरकारमध्ये सर्वाधिक योगदान हे भाजपचे नाही,असे या जाहिरातीमधून समोर आले आहे. शिंदे सरकारकडून देशात मोदी राज्यात शिंदे अशी जाहिरात देण्यात आली. या जाहिराती फडणवीस यांचा फोटो वगळण्यात आला होता. मुळात राज्य सरकारने जाहिरात देऊन चूक केली, असे पवार म्हणाले.
शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत रेल्वेनं प्रवास केला होता. त्यांच्या प्रवास करून मला ही आनंद झाला. त्यांनी सरकारच्या पाण्याबद्दल असलेल्या योजनेबद्दल माहिती दिली,असा खुलासाही पवारांनी केला. कर्नाटकमध्ये हेगडेवारांचे धडे काढले आहेत. त्यावर बोलताना लहान वयात मुलांवर चांगला संस्कार झाले पाहिजे. काँग्रेसने जाहिरनाम्यात सांगितले होते. त्यावर जनतेने बहुमत दिले आणि ते आता पूर्ण करत आहात, असं म्हणत पवारांनी कर्नाटक सरकारच्या भूमिकेचं समर्थक केलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.