महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा १९ फेब्रुवारी हा जन्मोत्सवाचा मुख्य दिवस आहे. यंदा शिवरायांची ३९३ वी जयंती साजरी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमी एकत्र जमून मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा साजरा केला जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव साजरा केला गेला. शिवनेरी किल्ल्यावर शिवसन्मानाचा पाळणा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जोजावला. यावेळी राज्यभरातून अनेक शिवप्रेमी शिवनेरीवर दाखल झाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बाळ शिवाजींना पाळण्यात घालण्यात आले. देवेंद्र फडणवीस सुद्धा याठिकाणी उपस्थित होते. नऊवारी नेसलेल्या कलाकारांनी यावेळी शिवरायांचा पाळणा गायला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. सुंदर फुलांच्या सजावटीत, पारंपरिक पद्धतीने अगदी विधिवत हा शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीस या दोघांनीही पारंपरिक पगडी परिधान केली होती.
शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यातून लाईव्ह https://t.co/LZzvqL5zx8 — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 19, 2023
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.