दुष्काळी गावांची पाहणी राहिली दूरच, संसदीय समितीनी घातलं साईबाबांच्या चरणी लोटांगण

दुष्काळी गावांची पाहणी राहिली दूरच, संसदीय समितीनी घातलं साईबाबांच्या चरणी लोटांगण

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

दिल्लीहून महाराष्ट्रात आलेल्या 13 खासदारांच्या संसदीय समितीने शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. महत्वाचं म्हणजे ही टीम दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी दिल्लीहून अहमदनगरमध्ये आली होती. मात्र, या खासदारांनी आपली जबाबदारी पार न पाडता कुटुंबासह देवदर्शन घेण्यातच धन्यता मानली.

 

पूर्व नियोजनानुसार ही समिती डाऊच बुद्रूक गावातल्या विकास कामांची पाहणी करणार होती. मात्र समितीचा ताफा थेट वळला तो शिर्डीमध्ये. यामुळे ग्रामस्थही चांगलेच संतापले. कारण समिती गावात येणार असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही जय्यत तयारी केली होती. त्यामुळे त्यांचीही निराशा झाली. देवदर्शनच घ्यायचं होतं तर मग हा दौरा कशासाठी असा सवालही इथल्या ग्रामस्थांनी उपस्थित केला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version