जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर
नेवासा ग्रामीण रुग्णालयतल्या कर्मचार्यांच्या संगंनमतांने खासगी रुग्णवाहिकेचे चालक मृताच्या नातेवाईकांची आर्थिक लूट करत असल्याचं उघडकीस आले आहे. पोस्टमार्टम साठीचं सामान आणऩ्यासाठी मृताच्या नातेवाईकांकडून अवाजवी रक्कम मागीतली जातेय. इतकच नाही तर खासगी रुग्णवाहीका चालक अवघ्या 25 किलोमीटर अंतरासाठी 3000 हजार रुपये आकारत ही लूट करत आहेत.
यासंदर्भात मृतांच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्र्यांकडे तक्रारही केली आहे. तसेच, रुग्णालयाच्या आवारामध्ये कुठलेही खासगी रुग्णवाहिका लावण्यास परवानगी नसतांना ग्रामीण रुग्णालयाच्या आवारामध्ये दररोज किमान दोन ते तीन खासगी रुग्णवाहिका लावण्यात येतात.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.