शिर्डीत गुन्हेगारी, हाणामारामारीचे सत्र सुरुच

शिर्डीत गुन्हेगारी, हाणामारामारीचे सत्र सुरुच

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

शिर्डीत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. शिर्डीत पोलिसांचा गुन्हेगारीवर वचक न राहिल्याने गुन्हेगारांचे मनोबल दिवसेंदिवस

वाढत चालले आहे. अशाच प्रकारची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे शिर्डीत घडली आहे.

शिर्डीच्या निमगवा शिवारात एका इसमाचा भोसकून खून करण्यात आला आहे.  नाना लहानु लोणारे असे या इसमाचे नाव आहे. हत्तेते कारण

अद्याप अस्पष्ट असून अज्ञात इसमावर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्ता आला आहे. तर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या

ताब्यात दिला. 

शिर्डीतील वाढत्या गुन्हेगारीमुळे साईभक्तांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version