जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी
शिर्डीतील कोपरगावात भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे.
काल राष्ट्रवादीच्या वतीने हल्लाबोल सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत आशुतोष काळे यांनी भाषणात आमदार स्नेहलता कोल्हे व बिपीन कोल्हे यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली.
या सभेमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांचा निषेध केला व आशुतोष काळे यांचा प्रतिकात्मक पुतळा रस्त्याने घेऊन विघानेश्वर चौकात दहन करीत असताना शिवाजी पुतळा येथे त्या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीपाद छिंदम यांचा पुतळा दहन करीत होते त्यांना आशुतोष काळे यांचा पुतळा भाजपच्या वतीने दहन करत असल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याकडे धाव घेतली व दोन्ही गट एकमेकांसमोर भिडले.
पोलिसांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना पांगवलं. यामुळे कोपरगाव शहरात तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.