पाण्यासाठी घडला हा जीवघेणा प्रकार

पाण्यासाठी घडला हा जीवघेणा प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, अकोला

अकोले शहरात पिण्याच्या पाण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली असून या घटनेत 3 जण जखमी झाले असून, मारहाण करणारे मात्र पसार झाले आहेत. अकोले शहरातील अनेक हॉटेल व्यावसायिक असून त्यांना गावातून पाईप लाईन द्वारे पाणी पुरवले जाते. या पाईप लाईन च्या वादातून ही हाणामारी झालं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हाणामारीत अक्षय धुमाळ, कैलास धुमाळ आणि महेश धुमाळ यांना मारहाण करण्यात आली असून या 3 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर अकोले पोलीस ठाण्यात या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version