मुंबई ते शिर्डी केवळ 6 तासांचा प्रवास

मुंबई ते शिर्डी केवळ 6 तासांचा प्रवास

जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी

 

साई दर्शनासाठी मुंबईहून शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांसाठी एक खास बातमी आहे.

 

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सहकार्यातून साईभक्तांच्या सुविधेसाठी दादर-शिर्डी ही साप्ताहिक पॅसेंजर सुरू करण्यात आली.

 

यावेळी सुरेश प्रभुंच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या पॅसेंजरची सुरुवात करण्यात आली. एकूण 17 कोच असलेल्या दादर-शिर्डी या पॅसेंजरमुळे मुंबईकरांना केवळ सहा

तासात शिर्डीला पोहचता येणार आहे.

 

ही पॅसेंजर प्रत्येक शुक्रवारी रात्री 9.45 मिनिटांनी दादर स्थानकातून सुटणार असून शनिवारी पहाटे 3.45 मिनिटांनी शिर्डीच्या साईनगर स्थानकात पोहचेल.

 

शिर्डीत येत्या ऑक्टोबरपासून साईसमाधी शताब्दी महोत्सवास प्रारंभ होणार आहे. इथे देश-विदेशातील भाविकांची मोठी गर्दी होत असल्यानं रेल्वे प्रशासनानं शिर्डीसाठी

नव्या ट्रेन सुरू करण्याचे धोरण आखलेय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version