मैदानात गोल्फ खेळता खेळता असे कोसळले शिंजो आबे, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मैदानात गोल्फ खेळता खेळता असे कोसळले शिंजो आबे, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

वृत्तसंस्था, आशिया

गोल्फ खेळताना जपानचे पंतप्रधान शिंजो आबे खाली कोसळल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नुकतेच आशिया खंडाच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्याबरोबर गोल्फ खेळत असतांना ही घटना घडली.

गोल्फच्या मैदानातून बाहेर रेतीच्या ठिकाणी शिंजो आबे पडत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. याठिकाणी असणाऱ्या उतारावरुन ते घरंगळत खाली आले. दरम्यान, व्हिडीओमधील आणखी एक गोष्ट सर्वांचे लक्ष वेधून घेते, ती म्हणजे शिंजो आबे पडले तेव्हा ट्रम्प यांचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. त्यांनी गोल्फ खेळणे सुरुचं ठेवलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version