कोरेगाव-भीमा घटनेनंतर शनीवारवाड्याबाबत पोलिस घेणार महत्वाचा निर्णय

कोरेगाव-भीमा घटनेनंतर शनीवारवाड्याबाबत पोलिस घेणार महत्वाचा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुण्याच्या शनिवारवाड्यावर सर्व प्रकारच्या खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्यात येणार आहे.

शनिवारवाड्यावर 31 डिसेंबर 2017 रोजी कोरेगाव भीमा विजयस्तंभाच्या द्विशताब्दीनिमित्त एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालिद यांच्या वादग्रस्त प्रक्षोभक भाषणांमुळेच कोरेगाव भीमाची दंगल उसळल्याचा अहवाल पोलिसांनी दिलाय.

या पार्श्वभूमीवर शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याचा प्रस्ताव पोलिसांनी सादर केलाय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version