उद्धव गटाविरोधात शिंदेंची पहिली खेळी

उद्धव गटाविरोधात शिंदेंची पहिली खेळी

विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेने पहिली खेळी खेळली आहे. विधानसभेपाठोपाठ आता विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार बजावण्यासाठी मुख्यमंत्र्यांची हालचाल सुरु आहे.

मंगळवारी, २८ फेब्रुवारी, २०२३ रोजी विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा प्रतोद नेमला आहे. विधानपरिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहिले आहे. विधानपरिषदेचे सदस्य विप्लव गोपीकिशन बाजोरिया यांची शिवसेनेचे प्रतोद पदी निवड करण्याचा ठराव झाल्याचे पत्रात केले सूचित केले आहे.

सोमवारी २७ फेब्रुवारी २०२३ पासून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेने पक्षादेश बजावला होता. तर,आता विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेने विधान परिषदेतही शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी हालचाली सुरु आहेत. त्यामुळे, विधान परिषदेतही शिवसेनेचा प्रतोद नेमण्यात आल्यावर उद्धव गटातल्या आमदारांना त्यांचा व्हिप लागू होणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version