‘शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री’

‘शिंदे लोकप्रिय मुख्यमंत्री’

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रथमच आज सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र सहभागी झाले आहेत. गडचिरोलीत आज शासन आपला दारी हा कार्यक्रम होत आहे. यासाठी हे तिन्ही नेते गडचिरोलीत आले आहेत. शपथविधीनंतर अजित पवार, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे प्रथमच एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी एका मंचावर आले आहेत. त्यामुळे हे तिन्ही नेते या कार्यक्रमातून जनतेला काय संबोधित करणार, हे पाहणे उत्सुकता होती.

कार्यक्रमात सुरूवातीला उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, ‘गेली ९ वर्षे देशाच्या सर्वांगिण विकासासाठी नरेंद्र मोदी आणि त्यांची टीम काम करत आहे. अशावेळी राज्यात आणि केंद्रात एकच सरकार असेल तर राज्यात विकासाचे काम करणे अधिक गतीने होते. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या महायुतीसोबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झालो आहोत.सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी राज्यात मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली शासन आपल्या दारी हा अभिनव कार्यक्रम राबवला जात आहे. पण, मंत्र्यांसोबतच आता प्रशासनाचे प्रमुख अधिकारी व सचिवांनीही गडचिरोलीचे दौरे केले पाहीजेत. सर्वसामान्यांर्यंत विकासाची गंगा नेहण्यासाठी प्रयत्न केले पाहीजेत.’

अजित पवार म्हणाले, ‘गडचिरोलीतही आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ झाले पाहीजे. जेणेकरून गडचिरोलीत राज्यासह देशातील नेत्यांना येणे सोयीचे होईल. याचबरोबर नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्गदेखील भंडारा, गडचिरोलीपर्यंत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.’ गडचिरोलीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीची जबाबदारी घेतली आहे. ते गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे गडचिरोलीच्या विकासाकडे राज्यातील प्रमुख नेत्यांचे लक्ष आहे. या भागाचा विकास व्हावा व नक्षलवाद संपावा, हेच शासनाचे धोरण आहे.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version