निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. या निर्णयानंतर शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांचे प्रोफाईल फोटो बदलले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे या नेत्यांनी ट्विटरवरील प्रोफाईल फोटो धनुष्यबाण असा केला आहे. त्यानंतर स्वत: एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरवरील प्रोफाईल पिक्चर बदलला आहे. त्यांनी प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण केले आहे.
शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उद्योगमंत्री उदय सामंत
उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई
खासदार श्रीकांत शिंदे
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर
कृषीमंत्री अब्दुल सत्तार
आरोग्य मंत्री तानाजी सावंत
बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.