शिंदे – फडणवीस आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात

शिंदे – फडणवीस आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं होतं. ते आव्हान मुख्यमंत्री शिंदे स्वीकारणार का हे पाहावं लागणार आहे. आज सायंकाळी ६ वाजता वरळीच्या आदर्श नगरमधील वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळतेय. या कार्यक्रमासाठी भाजपचे आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सत्कार सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर नागरी सत्काराचं आयोजन वरळीत करण्यात आलं. वरळी भोईवाडा समिती आणि सर्वोदय नाखवा समिती यांच्या माध्यमातून या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय.

या निमित्ताने वरळीत शिंदे गट जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. ज्या मंचावरून ही सभा होणार आहे तो मंचदेखील तयार करण्यात येत आहे. या भव्य मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार होणार आहे. यावेळी ते आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिउत्तर देतात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version