‘मी सिंगलच बरी’ – शिल्पा शिंदे

‘मी सिंगलच बरी’ – शिल्पा शिंदे

वृत्तसंस्था, मुंबई

बिग बॉसच्या 11व्या सीजनमध्ये शिल्पा शिंदेच्या लग्नाबाबत बरीच चर्चा झाली होती. एवढचं नाही तर तिची प्रतिस्पर्धी हिना खानसहीत घरातील इतर सदस्यांनी शिल्पाच्या लग्नाविषयी अनेकदा बरेच प्रश्न उपस्थित केले होते. अनेक टास्क आणि संकटांना तोंड देत,त्यावर मात देत अखेर शिल्पा ने जेते पद पटकावलही.

‘बिग बॉस’च्या 11व्या सीजनची विजेता पद जिंकल्यांनंतर शिल्पाने अखेर आपल्या लग्नाबाबत मौन तोडल आहे. एका मुलाखतीत शिल्पाने पहिल्यांदाच तिच्या लग्नाबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.

‘स्पॉट बॉय’ या हिंदी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शिंदेने लग्नाबाबत उत्तर दिलं. सध्या तरी माझा लग्न करण्याच कोणताही विचार नसल्याचं यावेळी शिल्पा म्हणाली. पण भविष्यात मात्र मी लग्न करेन असंही तिने त्या मुलाखतीत सांगीतल.

‘सध्या मी सिंगलच बरी आहे. सिंगल असल्याने मला जे स्वातंत्र्य मिळत आहे, त्याचा मला चांगला उपभोग घेता येत आहे. मी माझ्या आयुष्यात खुश आहे. पण भविष्यात मी माझ्या लग्नाचा विचार नक्की करेन. लग्न हा खूप मोठा निर्णय असतो, गंभीरबाब आहे, त्याचबरोबर खुप जबाबदाऱ्या ही असतात. त्यामुळे तुमचा जो पार्टनर असतो त्याचे विचार ही तुमच्याशी जुळणं गरजेचं असतं.’ असं शिल्पा यावेळी म्हणाली.

दरम्यान, असंही म्हटलं जातं होत की, शिल्पा शिंदेचं आणि रोमित राजचं लग्न ठरलं होतं. पण ऐनवेळी काही कारनास्तव हे लग्न मोडलं होतं. त्यामुळे शिल्पा शिंदे अजूनही सिंगलच आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version