सलमान खान आणि शिल्पा शे्ट्टी यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करणार बारामतीचे पोलिस

सलमान खान आणि शिल्पा शे्ट्टी यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करणार बारामतीचे पोलिस

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

काळविट शिकार प्रकरणी अनेक दिवस राजस्थान न्यायालयात हेलपाटे मारावे लागलेल्या सलमान खानच्या मागील शुक्लकाष्ट काही केल्याने संपताना दिसत नाहीत.

ड्रंक अँड ड्राईव्ह च्या तक्रारीतून कुठे मुक्तता होतेय न होतेय तोच आता एका नविन वादाला तोंड फुटलय. सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांनी एका चॅनलच्या कार्यक्रमाच्यावेळी एका विशिष्ट समाजाचा उल्लेख तुच्छतेने केला होता. त्याविरोधात बारामतीतील सामाजिक कार्यकर्ते विश्वास लालबिगे यांनी बारामती न्यायालयात जाती वाचक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.

यासंदर्भात वकील हेमचंद्र मोरे यांनी सांगितले की न्यायालयाने तक्रारदार यांची बाजू एकूण बारामती न्यायालयाने बारामती पोलिस स्टेशनला चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.  तसेच सदर चौकशी 26 फेब्रुवारीला न्यायालयाला देण्याचे आदेश दिले आहेत.  बुधवारी मुंबईतील भोईवाडा न्यायालयातही  सलमान खान आणि शिल्पा शे्ट्टी यांच्या वक्तव्याबद्दल तक्रार दाखल झालेली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version