दानवेंच्या जीभेचा शेंडा कापणाऱ्याला शेतकरी संघटनेकडून 5 लाखांचं बक्षिस जाहीर

दानवेंच्या जीभेचा शेंडा कापणाऱ्याला शेतकरी संघटनेकडून 5 लाखांचं बक्षिस जाहीर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या शेतकऱ्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटला आहे.

 

दानवेंच्या जिभेचा शेंडा कापूण आणणाऱ्याला पाच लाखांचं बक्षीस देणार असल्याचं शेतकरी संघटनेच्या वतीनं सांगण्यात येत आहे.

 

जालन्यात शेतकरी संघटनेच्या वतींनं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

 

या निवेदनात दानवेंच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. बेलात वक्तव्य करून शेतकऱ्यांना हिणावणाऱ्या दानवेंच्या जिभेचा तुकडा तोडून आणून देणाऱ्यास पाच लाखांचं बक्षीस जाहीर

करण्यात आले. विशेष म्हणजे बक्षीसाची रक्कम भीक मागून जमा करण्यात येईल, असंही या निवेदनात म्हंटले. भाजपनं मात्र या धमकीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version