शेतकरी कर्जमाफीसाठी भाजपची फिल्डिंग, भाजप नेत्यांची प्रमुख पक्षांसोबत चर्चा

शेतकरी कर्जमाफीसाठी भाजपची फिल्डिंग, भाजप नेत्यांची प्रमुख पक्षांसोबत चर्चा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्यावर मत घेण्यासाठी भाजपनं फिल्डिंग सुरु केली. भाजप नेते राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेताना दिसत आहेत.

 

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन भाजपनं आधी नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर मग महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि नसीम खान उपस्थित होते.

 

काँग्रेसनं शेतकरी कर्जमाफीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. 10 हजार रूपये मदत देण्याच्या जीआर मधील जाचक अटी रद्द कराव्यात,आत्महत्या ग्रस्त शेतक-यांच्या कुटुबांचे पुर्नवसन करावं अशा विविध मागण्या काँग्रेसकडून करण्यात आल्या. ही बैठक झाल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मातोश्रीवर गेले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version