अलविदा शशी कपूर…

अलविदा शशी कपूर…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ते आजारी असल्यानं कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवला आहे. 

शशी कपूर यांच्या पार्थीवावर मुंबईत अंत्यसंस्कार झाले. बॉलीवुड दिग्गज कलाकार यावेळी उपस्थित होते.  

 

शशी कपूर यांची कारकीर्द 

शशी कपूर यांचा जन्म 18 मार्च 1938 कोलकातामध्ये झाला

1940 पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण

आतपर्यंत 160 चित्रपटात काम

148 हिंदी आणि 12 इंग्रजी चित्रपटांचा समावेश

तब्बल 61 सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या

60 आणि 70च्या दशकात अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version