जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
“होणार सून मी ह्या घरची” फेम अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा बोहल्यावर चढला.
शशांक केतकर आणि प्रियंका ढवळे यांच शुभमंगल सावधान पुण्यात अत्यंत उत्साहात पार पडलं.
व्यवसायानं वकील असलेली प्रियंका आणि शशांक गेली अनेक वर्षे एकमेकांना ओळखत होतं. एप्रिल महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. मात्र, लग्नाची तारीख जाहिर झाली नव्हती.
मात्र, अचानक सोशल मीडियावर शशांकच्या लग्नाचं फोटो पाहिल्यानंतर शशांकच्या चाहत्यांना सुखद धक्काच बसलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.