शशांक देतोय नोकरीची संधी

शशांक देतोय नोकरीची संधी

मुंबई, 4 मे २०२३, प्रतिनिधी :स्टार प्रवाह वाहिनीवरील मुरांबा मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील रमा-अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.शशांक केतकर मालिका आणि चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतो. शशांक सतत आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.अभिनेता शशांक केतकर सध्या लंडनमध्ये एका आगामी सिनेमाच्या शूटिंग करत असल्यामुळे मालिकेच्या कथानकात तो कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्याचे दाखवण्यात आले आहे.

शशांक ने नुकताच एक व्हिडिओ त्याच्या समाज माध्यमांवर चाहत्यांसोबत सामायिक केला ह्या व्हिडिओची चर्चा सध्या सोशल मीडियावर बरीच रंगतेय.दरम्यान, लंडनमध्ये फिरताना त्याला एक असं हॉटेल दिसलं जिथे डोसे बनवणाऱ्याची गरज आहे. लंडनमधल्या मद्रास फ्लेवर्स या हॉटेलने ही जाहिरात लावली आहे. त्यावर लिहिलंय,’डोसा शेफ पाहिजे, २८ लाख पगार प्रतिवर्ष’. शशांक म्हणतो, ‘ तसं बरं चाललंय माझं पण तरी व्हावं का शिफ्ट?’डोसे करता येतात??? मग या तुम्ही.. २८,००,००० रुपये पगार आहे! असं पोस्ट मध्ये लिहीत हा गंमतीशीर व्हिडीओ सामायिक केला.

हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी बऱ्याच मजेशीर कमेंट्स केलेल्या पाहायला मिळतायत. याशिवाय शशांक आगामी ‘कैरी’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला असून यामध्ये त्याच्यासोबत सायली संजीव झळकणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version