शेअर बाजार कोसळला, 145 लाख कोटी पाण्यात!

शेअर बाजार कोसळला, 145 लाख कोटी पाण्यात!

कच्च्या तेलांच्या वाढलेल्या किमती आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण झाल्याने याचा फटका शेअर बाजाराला पुन्हा एकदा बसला. सेन्सेक्समध्ये 550 अंकांची घसरण झाली असून निफ्टीही 11 हजारांच्याखाली गेला आहे. शेअरबाजाराच्या आजच्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे 1.79 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

मुंबई शेअरबाजारमधील लिस्टेड कंपन्यांचे 145 लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. आज बाजार बंद होईपर्यंत शेअर बाजारमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. सेन्सेक्स 550 अंकांच्या घसरणीसह 35 हजार 975 अंकांवर बंद झाला, तर निफ्टी 150 अंकांच्या घसरणीसह 10 हजार 858 अंकांवर बंद झाला.

सेन्सेक्समध्ये घसरण झाल्याने याचा सर्वाधिक फटका ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ला बसला.

महिंद्राचे 6.80 टक्के शेअर पडले. अमेरिकेने इराणवर घातलेल्या बंदीमुळे कच्च्या तेलांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती आणि डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयांची होत असलेली घसरण या दोन्ही कारणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version