‘शरद पवारांचं राऊत होतोय?’

‘शरद पवारांचं राऊत होतोय?’

बुलढाणा, १ जुलै २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा येथील येथील समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या अपघातानंतर राज्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु झालेलं आहे. समृद्धी महामार्गावर मृत्यू झालेल्यांना लोक ‘देवेंद्रवासी’ झाला असं म्हणतात, अशी टीका अपघातानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. त्याला भाजपने उत्तर दिलं आहे.

भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले की,
बुलढाणा मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची देवेंद्रवासी म्हणून चेष्ठा करणाऱ्या शरद पवारांची मला कीव यायला लागली आहे. संगतीचा परिणाम काय असतो आता समजायला लागलं आहे. संजय राऊत यांच्या बरोबर राहिल्या नंतर शरद पवारांचं शरद राऊत व्हायला लागलं की काय सत्यता बाहेर यायला लागली आहे. सत्ता गेल्यानंतर माणूस वेडा होतो पण सत्ता गेल्या नंतर अनुभवी माणूस बोलवनपणाचा बोलायला लागतो लोकांन समोर यायला लागला आहे. पवार साहेब आपण जेष्ठ आणि मोठे आहात आपल्या तोंडातून ही भाषा शोभत नाही. आपण बोलण्यावर नियंत्रण ठेवल तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना तुमच्यावर टीका करावी लागणार नाही. अशी सडकून टीका भाजप नेते प्रसाद लाड यांनी पवारांवर केली.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version