…म्हणून उद्धव ठाकरेंची भेट घेतली – शरद पवार

…म्हणून उद्धव ठाकरेंची भेट घेतली – शरद पवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज नाशिकच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी जी एस टीमध्ये केलेला बदल हा गुजरात निवडणुकीमुळे केला असल्याचं म्हटलयं.

तसचं उद्धव ठाकरेंची भेट ही बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यसाठी झाल्याचं पवारांनी म्हटलंय.

शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकार विरोधात 25 नोव्हेंबर नंतर रस्त्यावर उतरणार असल्याचं सुतोवाच केलंय. तसचं आंदोलनकर्ता प्रत्येक शेतकरी हा राष्ट्रवादीचा असल्याचा भास  मुख्यमंत्र्याना होत असल्याचंही पवार म्हणालेयत.

गुजरात निवडणुकीत काँग्रेस सोबत युती करून लढणार असल्याचं ही पवार यावेळी म्हणालेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version